श्रीमती सरस्वती बच्चू पाटील |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील (वय वर्ष ९१) कोल्हापूर येथील संभाजीनगरातील राहत्या घरी वृध्दापळाने यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा, सून, २ मुली, नातवंडे असा परिवार आहे.
चंद्रकांत पाटील हे दुपारी कोल्हापुरात आले होते. आज त्यांची भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत सायंकाळी सहा वाजता बैठक होते. त्यापूर्वी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात गेले होते. मात्र बैठकीला जाण्यापूर्वी आपण आईंना भेटून येतो असे चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानंतर ते आईला भेटण्यासाठी संभाजीनगर येथील निवासस्थानी गेले. आईंना भेटल्यानंतर ते कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी निघतानाच त्यांच्या मातोश्री अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. माझी आई सरस्वती (वय ९१) आज देवाघरी गेली. वृद्धापकाळामुळे प्रकृती खाली-वर होत होती. प्रतिकूल परिस्थितीतही संसार करताना आईने आम्हा भावंडांवर स्वाभिमान आणि मेहनतीनं जगायचे संस्कार केले. या शिदोरीवरच माझी आयुष्यभर वाटचाल झाली आहे. आई, देवाघरूनही तुझं आमच्यावर लक्ष असेलच. ओम शांती! ” असं चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटद्वारे सांगितलं आहे.
No comments:
Post a Comment