प्रा. नामदेवराव दुंडगेकर शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था संस्थेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात, ९० लाखांचा नफा, १२ टक्के दराने लाभांश वाटप करणार - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2022

प्रा. नामदेवराव दुंडगेकर शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था संस्थेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात, ९० लाखांचा नफा, १२ टक्के दराने लाभांश वाटप करणार

 

प्रा. दुंडगेकर  शिक्षण सेवकांच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष प्रा. खरूजकर, बहलेले प्राचार्य पाटील, हरेर व संचालक मंडळ

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

             सभासदांचा विश्वास व संचालक मंडळाची कार्यतत्परता यामुळे संस्थेच्या आर्थिक प्रगतीला गती मिळाली असल्याने संस्थेला ९० लाख ८४ हजार रूपयांचा नफा झाला आहे. सभासदांचे हित डोळयासमोर ठेवून संस्थेची वाटचाल सुरू आहे . कर्जमुक्ती योजनेतुन मृत सभासदांचे ३५ लाख ४२ हजारांचे कर्ज माफ झाले आहे. त्यामुळे १२ टक्के दराने सभासदांना लाभांश देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिवाजी निंगोजी खरूजकर यांनी जाहीर केले. ते हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजीत केलेल्या प्रा. नामदेवराव दुंडगेकर चंदगड तालुका शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. ए. पाटील होते माजी अध्यक्ष शिवाजी कृष्णा हरेर प्रमुख हरेर यांनी प्रास्ताविकात संस्थेचा आर्थिक वर्षातील आढावा घेतला सचिव प्रदिप कृष्णा कुंभार यांनी अहवालवाचन केले.

       दिपप्रज्वलनाने सभेची सुरवात झाली. अहवाल सालात दिवंगत झालेले संस्थेचे ज्ञात अज्ञात हितचिंतक यांना श्रध्दांजली अर्पण करणेत आली. त्यानंतर सभासदांच्या पाल्यांमधुन सन २०२२ मध्ये १० वी १२ वी उत्तीर्ण विदयार्थी मधील गुणानुकमे आलेल्या विदयार्थ्याचा तसेच चंदगड तालुक्यातील इ . १० वी मधील तीन गुणवंत विदयार्थ्याचा रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करणेत आला. त्याचबरोबर संस्थेच्या सभासदांमधील सेवानिवृत सभासदांचा शाल, श्रीफळ स्मृतीचिन्ह व कृतज्ञता निधीचा धनादेश देऊन सत्कार करणेत आला. प्रा. सुखदेव शहापुरकर नामदेव कावळे आर. डी. पाटील, दयानंद होनगेकर यांनी कर्जमुक्ती योजनेच्या चर्चेत भाग घेतला. यावर सचिव कुंभार यांनी योजनेची कार्यपध्दती सांगीतली कोवाड येथे संस्थेच्या इमारतीसाठी खरेदी केलेल्या जमिनीच्या प्रश्नावर सभासदांनी चर्चा केली. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रा. डॉ. ए. वाय . जाधव शाखा अध्यक्ष अशोक पाटील विठ्ठल मोहिते सनिल सप्ताळे सुभाष गावडे यांच्यासह संचालकानी दिली . मायाप्पा कांबळे सुभाष भोसले रविंद्र वसंत देसाई व्ही. जी. पाटील बसवंत चिगरे एन आर पाटील एन. एम. मणगुतकर महादेव शिवणगेकर विश्वनाथ फगरे नरेंद्र हिशेवकर मधुकर मष्णु सुतार आदी सभासदांनी चर्चेत भाग घेतला. सुभाष बेळगांवकर यांनी सुत्रसंचालन केले. एस. डी. पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment