![]() |
मुख्यमंत्र्यांच्या भेटीप्रसंगी चंदगड तालुक्यातील शिवसैनिक. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका शिवसैनिकांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथील नंदनवन या निवासस्थानी भेट घेऊन पाठींबा दिला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यानी चंदगड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तालुक्यातील समस्या जाणून घेतल्या व चंदगड तालुक्यातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही आशी ग्वाही दिली. लवकरच चंदगड तालुक्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊया. या साठी कार्यकर्त्यांनी कामाला लागुन पक्ष बांधनी मजबूत करा तुम्हाला एक रुपयाही निधी कमी पढू देणार नाही.यावेळी माजी तालुका प्रमुख दिवाकर पाटील, तालुका प्रमुख कल्लाप्पा निवगीरे, दत्ता पाटील, सेवा सोसायटी चेअरमन विनोद पाटील, सरपंच नितीन पाटील, उपसरपंच बंडू गुडेकर, माजी उपतालुका प्रमुख ताजूदिन मंगसुळी, विभागप्रमुख विश्वास पाटील, मजरे कार्वे शाखा प्रमुख नामदेव बिर्जे, रघुनाथ पाटील, नागरदळे शाखा प्रमुख राजू मुदगेकर, शिवाजी पाटील, आमर प्रधान, अमर साळवी, महादेव जांबळे व शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment