पार्ले ग्रामसेवक मारहाण प्रकरणी दोषीवर कारवाई करावी. या मागणीचे निवेदन पं. स.चंदगडला देताना परशराम जाधव, एकनाथ राघोजी आदी |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
पार्ले (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक महादेव शिवाजी पाटील यांना झालेल्या मारहाणीचा चंदगड तालुका ग्रामपंचायत कामगार संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी ``१५ जुलै २०२२ रोजी ग्रामसेवक महादेव पाटील पार्ले ग्रामपंचायतीत काम करत असताना गावच्या सरपंच समृद्धी गावडे यांचे पती सुधाकर गावडे यांनी कार्यालयात जाऊन ग्रामसेवक यांना शिवीगाळ करून मारहाण केली. कार्यालयातील साहित्याची मोडतोड करून केबीनचा दरवाजा बाहेरून बंद केला. ही बाब अतिशय गंभीर व निषेधार्ह आहे. अशा प्रवृत्तीला वेळीच पायबंद न घातल्यास शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचेवर गुंडागर्दी करून त्रास देण्याचे प्रकार वाढू शकतात. त्यामुळे यातील मोकाट दोषींवर कठोर कारवाई करुन ग्रामपंचायत व शासकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे.
अशा आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांना आज मंगळवार दि. १९ रोजी देण्यात आले. गटविकास अधिकारी यांच्या वतीने पंचायत समिती ग्रामपंचायत विभाग कडील विस्तार अधिकारी बी. एम. कांबळे व ठोंबरे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी चंदगड तालुका ग्रामपंचायत संघाचे अध्यक्ष परशराम जाधव, सचिव एकनाथ राघोजी, संघटक नामदेव गावडे, संजय दळवी, शिवाजी कांबळे, संजय कांबळे व सदस्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment