मनसे कामगार सेना राज्य सरचिटणीस प्रशांत अनगुडे यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची भेट - चंदगड लाईव्ह न्युज

19 July 2022

मनसे कामगार सेना राज्य सरचिटणीस प्रशांत अनगुडे यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची भेट

मनसे कामगार सेना राज्य सरचिटणीस प्रशांत अनगुडे यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची भेट

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

            मनसेचे राज्य अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुन महिन्यात मनसे प्रणित मराठी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रशांत अनगुडे यांनी चंदगड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना रेनकोट आणि छत्र्या वाटपाचा कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी चंदगड तालुका हा पर्यटनाचा स्वर्ग असुन चंदगड तालुक्याचे पर्यटन पाहण्यासाठी पर्यटन मंत्र्यांनी चंदगड मध्ये यावे आणि मनसेने त्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना काही ज्येष्ठ पत्रकारांनी केली होती. 

                त्यानंतर मविआ सरकार कोसळले आणि मंत्रिमंडळही बरखास्त झाले. त्यानंतर आज प्रशांत अनगुडे यांनी राज ठाकरे यांच्या पत्नी सौ. शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली आणि नवीन मंत्रिमंडळ स्थापन होताच पर्यटन मंत्र्यांना चंदगडचे निसर्ग सौंदर्य पाहण्यास येण्याची सूचना करावी. तसेच त्यांच्यासोबत या दौऱ्यात आपणही चंदगडचे सौंदर्य पाहण्यास सहभागी व्हावे अशी विनंती केली. प्रशांत अनगुडे यांच्या विनंतीस मान देऊन सौ. शर्मिला ठाकरे यांनी ही चंदगडचे सौंदर्य पाहण्यास येण्याचा तसेच नवीन पर्यटन मंत्र्यांनाही याबाबत सुचविण्याचे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment