चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सावानिमित्ताने दिनांक २६/०७/२०२२ रोजी मॅरेथाॅन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तथापि, अतिपावसाने धावण्याचा मार्ग (Running Track) उखडला गेल्याने सदर स्पर्धेसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. त्यामुळे आयोजित केलेल्या मॅरेथाॅन स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेल्या आहेत. सर्व इच्छुक खेळाडूंनी याची नोंद घ्यावी असे आवाहन माडखोलकर महाविद्यालयाच्या क्रीडा समिती, सचिव, कार्याध्यक्ष, प्राचार्य व रौप्य महोत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment