चंदगड विभागातील तीन लघुपाटबंधारे प्रकल्प ओव्हर फ्लो, कोणते आहेत हे प्रकल्प.......वाचा...... - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2022

चंदगड विभागातील तीन लघुपाटबंधारे प्रकल्प ओव्हर फ्लो, कोणते आहेत हे प्रकल्प.......वाचा......

किटवाड नंबर १ धरणाच्या सांडव्यात असलेल्या झिगझॅग आकाराच्या भिंतीवरून पडणारे ओव्हर फ्लो चे पाणी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

             चंदगड उपविभागातील तीन लघु पाटबंधारे तलाव आज दि. १७ रोजी ओव्हर फ्लो झाले. यात कळसगादे, किटवाड नं. १ व कुमरी येथील धरणांचा समावेश आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी चंदगड पाटबंधारे उपविभाग यांनी दिली आहे.

            चंदगड उपविभागात जंगमहट्टी, घटप्रभा- फाटकवाडी, ताम्रपर्णी नदीवरील झांबरे- उमगाव हे तीन मध्यम प्रकल्प तर १६ लघुपाटबंधारे प्रकल्प आहेत. गेल्या तीन वर्षातील महापूर पाहता खबरदारीचा उपाय म्हणून यंदा सर्वच तलावातील बहुतांशी पाणी एप्रिल ते जून महिन्यात सोडून देण्यात आले होते. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीस सर्वच धरणांमध्ये २५ टक्केच्या आसपास पाणीसाठा शिल्लक होता. जून महिन्यात मृग नक्षत्राने दडी मारल्यामुळे यंदा धरणे लवकर भरणार नाहीत अशी धारणा होती. 

          मात्र गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे फाटकवाडी व झांबरे हे मध्यम तर कळसगादे हा लघु प्रकल्प मागील आठवड्यातच ओव्हरफ्लो झाला होता. तर आज १७ जुलै रोजी सकाळी कुमरी व किटवाड नं. १ हे दोन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.  परिणामी ताम्रपर्णी नदीच्या पाणी पातळीत यापुढे वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवर्षी पूर्व बाधित होणाऱ्या क्षेत्रातील नागरिक, व्यापारी यांनी जीवित व वित्त हानी होणार नाही यासाठी सजग राहावे असे आवाहन गडहिंग्लज उपविभागीय तथा प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment