पाय घसरून धरणात पडल्याने तुडिये येथील शेतकऱ्याचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2022

पाय घसरून धरणात पडल्याने तुडिये येथील शेतकऱ्याचा मृत्यू

  


चंदगड / प्रतिनिधी

 तुडिये ता.चंदगड येथील रोप लागण झाल्यानंतर हात पाय धुण्यासाठी तिलारी धरणात गेलेल्या शेतकऱ्याचा पाय घसरून पाण्यात पडल्याने त्याचा मृत्यु झाला.वसंत अर्जुन हुलजी (वय वर्ष ३०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे

      तुडिये धरणाजवळ असलेल्या शेतात भात रोप लागणीचे काम संपल्या नंतर हात पाय धुण्यासाठी धरणाच्या पाण्यात गेला असता पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला.याबाबतची वर्दी मारूती बाबु हुलजी यानी चंदगड पोलीसात दिली आहे.अधिक तपास पो ना पाटील करत आहेत.





No comments:

Post a Comment