लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या फोटोचे पुजन करून शिक्षण परिषदेचे उद्घाटन करताना मान्यवर. |
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) केंद्रांतर्गत नुकत्याच केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथे झालेल्या पहिल्या शिक्षण परिषदेत निपुण भारत मिशन अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे स्वागत केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वै. पाटील तर प्रास्ताविक विलास शंकर पाटील यांनी केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिक्षण परिषदेत तज्ञ मार्गदर्शक संतोष नारायण सूर्यवंशी यांनी निपुण भारत मिशन आवश्यकता व पार्श्वभूमी, विजय कल्लाप्पा पाटील यांनी निपुण भारत मिशन ची उद्दिष्टे, युवराज दत्तात्रय पाटील यांनी 'की' रिजल्ट एरिया व विद्यांजली ॲप ची माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत पा रा पाटील, अनंत पाटील, आप्पाराव पाटील, गणपती लोहार, श्रीकांत सु. पाटील आदींनी सहभाग घेतला.
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारवे येथील विरंगुळा केंद्राच्या उभारणीचा आढावा सादर केला. यावेळी बहुतांशी शिक्षकांनी विरंगुळा केंद्रास आर्थिक मदत प्रदान केली. यावेळी टी एम सोल्युशन चे संचालक संतोष येरुडकर व किरण गुरव यांनी उपस्थित राहून शिक्षकांना इन्कम टॅक्स संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूरचे नूतन संचालक बाबुराव परीट उपस्थित होते. केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment