कै. रा. म. माद्याळकर एज्युकेशन सोसायटी आयोजित पुरस्कारासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2022

कै. रा. म. माद्याळकर एज्युकेशन सोसायटी आयोजित पुरस्कारासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         कै. रा. म. माद्याळकर एज्युकेशन सोसायटी आयोजित मराठी साहित्य पुरस्कार सन २०२० -२१ साठी देण्यात येणाऱ्या  पुरस्कारासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 कथा,कविता,कादंबरी,नाटक,चरित्र,बालसाहित्य,आत्मचरित्र,प्रवासवर्णन,लोकसाहित्य,विज्ञान साहित्य,समीक्षा या साहित्य प्रकारासाठी अनुसरून सन २०१७ ते २०२१ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या ४ (चार) प्रतींसह अर्जासोबत २ फोटोसह ३० सप्टेंबर ,२०२२ पर्यंत पाठविण्याचे आवाहन करीत आहोत. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र , रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असून प्रत्येक साहित्य प्रकाराला १००₹(शंभर रुपये ) प्रवेश फी आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यांसह अन्य राज्यातील मराठी लेखक स्पर्धेत भाग घेऊ शकतात. सर्वांना सहभागी प्रमाणपत्र देणेत येईल. प्रवेश फी करिता.

Google pay no - 9373906445

किंवा लोकअक्षर पब्लिकेशन, गडहिंग्लज.

पुणे जनता सहकारी बँक शाखा- गडहिंग्लज.

A/C - 064230100000209

IFSC - ISBP0000064.

 पत्ता- लोकअक्षर पब्लिकेशन,

केशव संकुल, बँक ऑफ बडोदा जवळ, टिळक पथ,गडहिंग्लज, जि. कोल्हापूर , महाराष्ट्र 

पिन- ४१६५०२.

संपर्क - ९३७३९०६४४५,९९७५८६३०२२

No comments:

Post a Comment