चंदगडचे पोलिस निरिक्षक यांची `सदृढ शाळा, सक्षम शाळा` या अभियानाअंतर्गत संजय गांधी विद्यालयाला भेट, विद्यार्थ्यांशी साधला संवाद - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2022

चंदगडचे पोलिस निरिक्षक यांची `सदृढ शाळा, सक्षम शाळा` या अभियानाअंतर्गत संजय गांधी विद्यालयाला भेट, विद्यार्थ्यांशी साधला संवाद

नागनवाडी (ता. चंदगड) येथील संजय गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना चंदगडचे पोलिस निरिक्षक संतोष घोळवे, बाजुला शिक्षक. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

              नागनवाडी (ता. चंदगड) येथील संजय गांधी विद्यालय नागणवाडी या शाळेत `सदृढ शाळा, सक्षम शाळा`  या अभियानाअंतर्गत शुक्रवारी (ता. 22) चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांनी भेट दिली.

         यावेळी त्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमामध्ये मुलांना वाहतुकीचे नियमांचे महत्त्व, सोशल मीडियाचा वापर, स्पर्धापरीक्षेस करिअरमध्ये उपलब्ध संधी व त्यामध्ये शालेय तसेच पोलीस दलाचे कार्य  अभ्यासक्रमाचे महत्त्व, हर घर तिरंगा या उपक्रमाची माहिती,पोलिस दलाचे कामकाज व कार्यपद्धती तसेच मुलींना गुड टच बॅड टच व आत्मसंरक्षण करण्याच्या पद्धती याबाबत माहिती दिली. सदर शाळेच्या विद्यार्थ्यांना पोलिस स्टेशनला भेट देण्याकरिता आमंत्रित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसह विद्यालयाचा शिक्षक वर्ग उपस्थित होता. 

No comments:

Post a Comment