मतदान केल्यानंतर बोट दाखविताना वि्दयार्थ्यींनी |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
पॅनेल तयार करणे, अर्ज भरणे, डिपॉझीट भरणे, माघार घेणे, प्रचार करणे मतपत्रिका, उमेदवारांचे चिन्ह, बोटाला शाई लावणे, ओळखपत्र तपासणी, मतदान कक्ष, निवडणूक अधिकारी, गुप्त मतदान, निकालाची उत्कंठा व निकालानंतरचा जल्लोश ही कुठल्या राजकिय पक्षांची निवडणूक नव्हती तर चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुलांना लोकशाही वरचा विश्वास दृढ व्हावा म्हणून प्रत्यक्ष निवडणूक प्रकिया राबवली गेली.
मतदान प्रक्रिया राबविताना. |
प्राचार्य आर. पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्व पटवून सांगितले. या निवडणूकीमध्ये मुख्यमंत्री म्हणून पार्थ बल्लाळ तर विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणून श्रद्धा कानूरकर यांची बहुमताने निवड करण्यात आली. सांस्कृतिक मंत्री सुकन्या दळवी, सहल मंत्री - झोया तासिलदार, क्रीडा मंत्री हर्षद हळदणकर, आरोग्य मंत्री धनंजय गावडे, प्रार्थना मंत्री जान्हवी आनंदाचे, हस्तलिखित मंत्री सुकन्या आनंदाचे, स्वच्छता मंत्री - निधी पाटील, भिती पत्रक मंत्री वेदांत उंबरे, पोषण आहार मंत्री संस्कृती वाके यांनी विजय मिळविला. सर्व विजयी उमेदवारांचे गुलालाची उधळण करून जल्लोषी स्वागत करण्यात आले.
या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक आयुक्त म्हणून एम. व्ही. कानूरकर यांनी नियोजन केले. निवडणूक अधिकारी टी. टी. बेरडे, जे. जी. पाटील, डी. जी. पाटील, एस. जे. शिंदे, विद्या डोंगरे, वर्षा पाटील, विद्या शिंदे, यांनी काम पाहिले. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी संजय साबळे, बी. आर. चिगरे, टी. व्ही. खंदाळे, सूरज तुपारे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment