शिनोळी खुर्द येथील नारायण करटे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2022

शिनोळी खुर्द येथील नारायण करटे यांचे निधन



कागणी : सी. एल. वृत्तसेवा

 शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथील हभप नारायण गुंडू करटे (वय 83) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी दि. 22 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते सोंगी भजन कलाकार म्हणून प्रसिद्ध होते. पूर्वी त्यांनी अनेक गावात सोंगी भजन सादर करण्यासाठी पुढाकार घेतला होता. गावात ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर होते. हलकर्णी येथील दौलत साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक कै. मारुती नागोजी खांडेकर यांचे ते जावई होते. उचगाव फाटा, कल्लेहोळ क्रॉस (ता. बेळगाव) येथील गणेश दूध संघाचे मॅनेजर सुधाकर करटे यांचे ते काका होत. सोमवार दि. 24 रोजी सकाळी रक्षा विसर्जन होणार आहे.



No comments:

Post a Comment