गडहिंग्लज आगार प्रमुख संजय चव्हाण याना निवेदन देताना अनिकेत पाटील |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
माजी विद्यार्थी संघटना वि. मं. अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) यांचेकडून आज एस. टी. डेपो गडहिंग्लज आगार प्रमुखाना गडहिंग्लज -अर्जुनवाडी बस सुरु करणेबाबत निवेदन देण्यात आले. अर्जुनवाडी गावातील मोठ्या संख्येने मुले -मुली नेसरी, महागाव व गडहिंग्लज येथे उच्च शिक्षणासाठी जातात. पण गडहिंग्लज आगाराकडून अर्जुनवाडी बस बंद केल्याने त्यांची गैरसोय होत आहे. गावातून अर्जुनवाडी फाट्यापर्यंत दोन किमी अंतर चालत जाऊन मग चंदगड - गडहिंग्लज बस पकडावी लागते. यामुळे या मार्गावर एस. टी. बस सुरु करणेबाबत गडहिंग्लज आगार प्रमुख संजय चव्हाण यांचेकडे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव अनिकेत पाटील, सदस्य विनायक नाईक व अक्षय पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment