तेऊरवाडीच्या विनय पाटीलची अमेरिकेला गरुडझेप - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2022

तेऊरवाडीच्या विनय पाटीलची अमेरिकेला गरुडझेप

तेऊरवाडी येथील विनय पाटील व पत्नी सौ. वर्षा

तेऊरवाडी / सी.एल. वृत्तसेवा

        तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील विनय राजाराम पाटील यांची ब्रिस्टल अमेरिका येथील कंपनिमध्ये टिम लीडर म्हणून निवड झाल्याने थेट अमेरिकेला गरूडझेप मारली.  यासाठी विनय  त्यांची पत्नी सौ. वर्षा व मुलगा कु. विराज आज अमेरिकेला रवाना झाले .यासाठी तेऊरवाडी ग्रामस्थांनी विनयला शुभेच्छा दिल्या.

         तेऊरवाडी गाव जरी  पाण्याच्या बाबतीत कोरडवाहू असले तरी बुध्दीवंतांच्या बाबतीत खूपच अग्रेसर आहे. या अगोदरच येथील अनेक युवक अमेरिका, जर्मनी, दुबई, आर्यलँड आदि देशात नोकरीसाठी व उच्च शिक्षणासाठी गेले आहेत.आज विनय पण अमेरिकेला हेपिएस्ट माईंड टेक्नॉलॉजी लि. बेंगलोर तर्फे ब्रिस्टल अमेरिकेला टिम लिडर म्हणून गेला. याबरोबरच विनयची बहिण सुद्धा जर्मनीमध्ये नोकरीच्या निमित्ताने गेली होती. यावेळी वडील राजाराम पाटील (रोडके), आई सौ. प्रेमावती पाटील, दत्तात्रय गुरव, सौ. सुरेखा गुरव यांच्यासह ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.

                                 

No comments:

Post a Comment