वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस देताना प्राचार्य डाॅ. पाटील, शेजारी इतर मान्यवर. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन माजी प्राचार्य एस. व्ही. गुरबे यांच्या हस्ते झाले".
वक्तृत्व स्पर्धेसाठी वाचन संस्कृती रुजणे गरजेचे आहे. चांगले बोलण्यासाठी व्यासंग करायला हवा. यश व अपयश याचा विचार न करता विद्यार्थ्यांनी बोलण्याची कला आत्मसात करायला हवी. आपल्या बोलण्यातून भाव प्रकटीकरण घडले पाहिजे. यासाठीच अशा स्पर्धा खूपच महत्त्वाच्याअसतात."असे मत व्यक्त केले.
अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी अल्पावधीत महाविद्यालयाने विविध क्षेत्रात केलेल्या नेत्रदीपक प्रगतीचा आढावा घेतला. भविष्यात हे महाविद्यालय विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम राबविण्यास कटिबद्ध असून महाविद्यालयातील सर्व सेवक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करतात -"असे प्रतिपादन केले.
यावेळी झालेल्या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे_वरिष्ठ गट_ प्रथम क्रमांक _तेजस्विनी पांचाळ, द्वितीय क्रमांक _तय्यबा मुल्ला, तृतीय क्रमांक _संकेत पाटील, उत्तेजनार्थ _इंद्राणी पाटील, कनिष्ठ गट _प्रथम क्रमांक_ सोनल सुरतकर ,द्वितीय क्रमांक_ अनुजा लोहार, तृतीय क्रमांक_ कृष्णाई पवार, उत्तेजनार्थ _आर्या साबळे, स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. बी. आर. दिवेकर. प्रा. एस. जी. साबळे, प्रा. जी. एस. मुरकुटे, बी. आर. चिगरे, एच. आर. पाऊसकर, आर. जी. शिवणगेकर यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. एल. एन. गायकवाड. प्रा डॉ. ए. वाय. जाधव, प्रा. पी. ए. गवस व सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. टी. एम. पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment