विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता सिद्ध करावी - प्राचार्य डॉ. पाटील, माडखोलकर महाविद्यालयात सामान्यज्ञान स्पर्धा उत्सााहात - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2022

विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता सिद्ध करावी - प्राचार्य डॉ. पाटील, माडखोलकर महाविद्यालयात सामान्यज्ञान स्पर्धा उत्सााहात

माडखोलकर महाविद्यालयात आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेवेळी बोलताना मान्यवर. 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           "सध्याच्या युगात स्पर्धा परीक्षा अपरिहार्य आहेत. विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य व क्षमता सिद्ध करण्याशिवाय पर्याय नाही. आपले नाणे खणखणीत वाजणारे असेल तरच आपण या बदलत्या परिस्थितीत टिकाव धरू शकतो.आत्तापासूनच स्पर्धा परीक्षांचा कसून सराव केला तर निश्चितच उज्ज्वल भवितव्य आहे ".असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.

           उद्‌घाटक न. भु. पाटील व दि न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य आर. पी. पाटील यांनी स्पर्धा परीक्षांचे स्वरूप जाणून घेऊन योग्य मार्गदर्शना खालीच अभ्यास केला पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला जलार्पणकरण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे. 

         वरिष्ठ गट- अनुक्रमे महेश राणे, पूजा लाड, संजय चिमणे, गजानन मोहनगेकर.

         कनिष्ठ गट- अनुक्रमे शैलेश धुडुम, यश डांगे, साक्षी चव्हाण, विक्रांत पाटील, अभिषेक कांबळे.

          विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके, प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी व्यासपीठावर रौप्य महोत्सव समिती सचिव प्रा. डॉ. पी. एल. भादवणकर, कार्याध्यक्ष प्रा. एस. के. सावंत, खजिनदार प्रा. डॉ. एस. डी. गोरल, डॉ. ए. वाय. जाधव यांच्यासह प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. आर. के. तेलगोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी तर आभार डॉ. एन. के. पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment