अतिवृष्टीमुळे पडझड झालेली भिंत. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
वाळकुळी (ता. चंदगड) येथे अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे अनंत आर्जून यादव यांच्या राहत्या घराची एक पूर्ण भिंत पडून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सदरील पडझड झालेल्या भिंतीचा पंचनामा करणेसाठी तलाठी कार्यालयात फोन वरून संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही. शासनाने दखल घेवून पिडीत यादव कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वाळकुळी ग्रामस्थांनी केली आहे.
No comments:
Post a Comment