चंदगड जि. प. गण व पं. स. गटाची आरक्षण सोडत रद्द - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2022

चंदगड जि. प. गण व पं. स. गटाची आरक्षण सोडत रद्द


चंदगड / प्रतिनिधी

चंदगड तालुक्यात उद्या बुधवारी १३ जुलै रोजी होणारी जि.प.गण व पं.स. गटाची साठीची निवडणूक आरक्षण सोडत अतिवृष्टी व ओबीसी आरक्षण निर्णयामुळे रद्द करण्यात आली आहे.

चंदगड तालुक्यात पंचायत समितीच्या निवडणूका घोषित करण्यात आल्या आहेत. त्याची आरक्षण सोडत उद्या (बुधवारी) चंदगड येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात येणार होती. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेला अतिमुसळधार पाऊस आणि न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भात प्रलंबित असलेला निर्णय यामुळे ही आरक्षण सोडत रद्द करत असल्याचे तहसिल कार्यालयातून कळवले आहे.
No comments:

Post a Comment