चंदगड आरोग्य विभाग कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेत जिल्ह्यात अव्वल, चंदगडच्या तीन सर्जनाचांही केला सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2022

चंदगड आरोग्य विभाग कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेत जिल्ह्यात अव्वल, चंदगडच्या तीन सर्जनाचांही केला सत्कार


चंदगड/प्रतिनिधी :-- 
राष्ट्रीय कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत चंदगड तालुका आरोग्य विभाने जिल्ह्यात अव्वल क्रमांक मिळविला.डाॅ.आरविंद पठाणे (माणगाव)डॉ. बी.डी.सोमजाळ (अडकूर) डॉ. एस जी कांबळे(हेरे) या तीन सर्जनाचांही काल कोल्हापूर येथील जि.प.शाहु सभागृहात जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून मुख्यकार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते, 
जिल्हा वैद्यकीय अधिकारी योगेश साळे,प्रा.डॉ रूपा शहा डाॅ फारुख देसाई, डॉ विलास देशमुख यांच्या उपस्थितीत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.डी.सोमजाळ (अडकूर)डाॅ.आरविंद पठाणे (माणगाव),डॉ. एस जी कांबळे या सर्जनाच्या बरोबरच अन्य कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.
   प्रारंभी प्रास्ताविक जिल्हाआरोग्य अधिकारी डाॅ योगेश साळे यानी करून आपण जर योग्य वेळी लोकसंख्या नियंत्रणात  आणली नाही तर मोठ्या समस्याना सामोरे जावे लागेल असे सांगितले.
 यावेळी डॉ रूपा शहा यानी मुलीचे वय २१ वर्ष व मुलाचे वय २५ वर्षाच्या बाहेर केले तर लोकसंख्या थोडीशी नियंत्रणात येईल. लोकसंख्येच्या झपाट्याने होणाऱ्या वाढी मुळे सामाजिक विषमतेची रुंदावत आहे.त्यातच मुलगी नको या मानसिकते मुळे समाजात शंभर मुलांमागे ८०पर्यत मुली आहेत. त्यामुळेच आज लग्न ठरवताना मुलीच्या आईबापांना रोख स्वरूपात रक्कम द्यावी लागत आहे. 
  मुख्याकार्यकारी अधिकारी श्री.चव्हाण म्हणाले लोकसंख्येच्या विस्फोट मुळे आज अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, गरिबी, बेकारी या दोन जटील समस्या निर्माण झाल्या आहेत. साधने अंकगणिताप्रमाणे तर लोकसंख्या भुमितिय पध्दतीने वाढत असतात.त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या या न सुटणाऱ्या असतात. लोकसंख्या नियंत्रणासाठी आज साक्षर समाजाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी डाॅ विलास देशमुख यानी लोकनियत्रंणासाठी कोणती अधुनिक साधने वापरावीत यासंबंधी मार्गदर्शन केले.
     यावेळी जिल्ह्यात कुटूंब कल्याण नियोजन शस्त्रक्रियेत चंदगड तालुक्याचे एकूण उद्दीष्टापैकी ८४९ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पुर्ण करून जिल्ह्यात अव्वल क्रमांक मिळविला.तर माणगाव आरोग्य केंद्राचे डाॅ.आरविंद पठाणे (२३४),अडकुर आरोग्य केंद्राचे डॉ. बी.डी.सोमजाळ (१३४) हेरे आरोग्य केंद्राचे डॉ. एस जी कांबळे (१०९) यांच्यासह आरोग्य सेवक अमोल घेंडे( हेरे),निलम संभाजी गावडे (पार्ले ) यांचाही यावेळी उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी रवी पाटील,वसंत गायकवाड,जनार्दन झोले,गजानन कुंभार,भिमाना चिंचणगी, चंद्रकांत बेनके,सातेरी पाटील, मंगल नाईक, रेखा मधाळे,आनंद काबळे,आदीसह कर्मचारीवर्ग उपस्थित होता.


No comments:

Post a Comment