चंदगड तालुक्यात बेंदुर उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2022

चंदगड तालुक्यात बेंदुर उत्साहात साजरा


चंदगड / प्रतिनिधी

चंदगड तालुक्यात महाराष्ट्रीयन बेंदुर(चिखल बेंदूर) पारंपारिक पध्दतीने  उत्साहात साजरा  करण्यात आला. सकाळी शेतकरी वर्गाने वर्षभर साथ देणाऱ्या बैलांची पूजा करुन हा सण साजरा केला. सकाळी बैलांना गरम पाण्याने अंघोळ घातली त्यानंतर शिंगाना आकर्षक रंगरगोटी केली तर शिंगाना रंगीबीरंगी गोंडे बाधले, सांयकाळी घरातील सर्व सदस्यांनी बैलांची पूजा करुन उडऱ्यांचा नैवेद दाखवला नंतर बैलांच्या गळ्यात रुढी पंरपरेनुसार उडऱ्यांची माळ बांधण्यात आली. त्यानंतर सर्वांनी मिळवुन भोजनाचा आस्वाद घेतला. दरम्यान सकाळी घरातील जाणती वयस्कर माणसं मोहोळापासून ओळया( दोरी) पासवायची. ओळयामध्ये पळसाचे पान व वाक घातला जातो. वाक म्हणजे पळसाचे मुळ जाझवून त्याचे पार चिप्पाड बनवून त्याचे धाग्यात रुपांतर झाले की ते ओळयामध्ये रंगवून घातले जायचे . याचे गोंडेही केले जायचे. पूर्वीची वयस्कर माणसे हा वाक बनवायची. पूर्वीची नांगर ,जु, गूट्टा, हेंडोरं, पेसाटी, बैलगाडी, तीटं,कोळपा,फावडे(खोरे)या औजारासह घराच्या चौकटीना या ओळ्या बांधाल्या जातात , काळाच्या ओघात बैल बाळगायचे बंद झाले आणि ही अवजारेही नामशेष झाली आहेत.  शेतीकाम करण्यासाठी ट्रॅक्टर आले.चंदगड तालुक्यात काही ठिकाणी बैलांची मिरवणूक काढण्यात आली.
No comments:

Post a Comment