तळेवाडी येथे राज्य मार्गावर आलेल्या ओढ्याच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास |
तेऊरवाडी / एस. के. पाटील
आज सायंकाळी चारच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने चंदगड -नेसरी राज्य मार्ग क्र. १८९ वर तळेवाडी (ता. गडहिंग्लज) नजीक पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. पण येथे आलेल्या पूराच्या पाण्यातून पोलीसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास चालू होता.
चंदगड -आजरा गडहिंग्लज परिसरात आज जोरदार पाऊस झाल्याने अनेक बंधारे पाण्याखाली जाऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. तळेवाडीजवळ असणाऱ्या ओठ्याला पाणी आल्याने राज्य मार्ग पाण्याखाली गेला. नेसरी पोलिस स्टेशनचे पीएसआय श्री वालकी व पो. कॉ. निकम यांनी येथील वाहतूक थांबवून वहानधारकांना धोक्याची कल्पना दिली. तरी पण अनेक जन जीव धोक्यात घालून या पाण्यातून गाडया घालतच होते.
घटप्रभा नदिला महापूर आला असत्याने या नदिवरील हडलगे, गणूचीवाडी, कानडी बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूलला गणूचीवाडी येथून आलेले विद्यार्था या पूलावर पाणी आल्याने अडकले होते. पण हायस्कूलच्या शिक्षकानी या विद्यार्थी -विद्यार्थिनिना अडकूर -आमरोळी मार्गे गणूचीवाडीला पोहचवले. एकंदरीत चंदगड विभागात पावसाचा जोर असाच राहिला तर पूरपरिस्थिती गंभीर बनू शकते.
No comments:
Post a Comment