गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनासोबत गुरुपोर्णिमा साजरी करताना विद्यार्थींनी. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
'गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती आहे. शालेय जीवनात गुरुंच्या संस्कारामुळे आपले जीवन सुखकर बनते. भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे माणले जाते. खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला दिशा दाखवणारे होकायंत्र म्हणजे गुरु होय असे प्रतिपादन प्राचार्य आर. पी. पाटील यांनी केले.
दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने अध्यक्ष पदावरून प्राचार्य आर. पी. पाटील बोलत होते. प्रास्ताविक एस. जी. साबळे यांनी केले. कु. रिया मुल्ला, समृद्धी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व अध्यापकांचे औक्षण करून सर्वांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
यावेळी टी. एस. चांदेकर, एम. व्ही. कानूरकर, जे.जी पाटील , व्ही . के गावडे , डी .जी. पाटील , बी आर चिगरे , व्ही टी. पाटील ,एस जे शिंदे , सूरज तुपारे , शरद हदगल , रवि कांबळे ,पुष्पा सुतार , विद्या डोंगरे , वर्षा पाटील , विद्या शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. सुकन्या आनंदाचे तर हिने केले तर आभार आर्या मोहिते हिने मानले.
No comments:
Post a Comment