सतत बदलणाjऱ्या हवामानामुळे ऊसावर हुमणी, तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव, तुर्केवाडी येथे ओलमच्या वतीने मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

13 July 2022

सतत बदलणाjऱ्या हवामानामुळे ऊसावर हुमणी, तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव, तुर्केवाडी येथे ओलमच्या वतीने मार्गदर्शन

तुर्केवाडी ता.चंदगड येथे ओलम (हेमरस) कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना हुमणी व तांबेरा रोगावर मार्गदर्शन करताना शास्त्रज्ञ सुरेश माने-पाटील, समोर शेतकरीवर्ग 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      सतत बदलणा-या हवामानामुळे यंदा तालुक्यातील अनेक भागात ऊसावर हुमणी व तांबेरा या रागांचा मोठा फैलाव झाला आहे.या किडीवर वेळीच नियंत्रण मिळवणे आवश्यक असून आम्ही शेताच्या बांधावर जाऊन उपाययोजना, औषधे यांची माहिती देत आहोत. त्यातही शेतकऱ्यांनीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (पुणे) येथील माजी ऊस पिक शास्त्रज्ञ सुरेश माने-पाटील यांनी व्यक्त केले.तुर्केवाडी ता.चंदगड येथे हेमरस (ओलम) साखर कारखान्याच्या वतीने आयोजित ऊस पीक परिसंवादात कार्यक्रमात ते बोलत होते.
                                                 
                   तुर्केवाडी (ता. चंदगड) ओलमच्या वतीने आयोजित मार्गदर्शन मेळाव्याला उपस्थित शेतकरी.

       या 'ऊस पीक परिसंवाद' या कार्यक्रमात ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला असल्याने विशेषतः हुमणी व तांबेरा या किड व रोग याविषयी ऊस विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी तुर्केवाडी येथील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, प्रश्नही विचारले गेले,तसेच व सतत असे कार्यक्रम व्हावेत अशी मागणी सुद्धा करण्यात आली.
      यावर्षी चंदगड तालुक्यात ऊस लागवडीच्यावेळी वारंवार होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे तालुक्यातील जवळपास दिड हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यातूनही हेमरस (ओलम) साखर कारखान्याच्या वतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना यासंदर्भात मार्गदर्शन व मदत करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून तुर्केवाडी येथे हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी हेमरस (ओलम) कारखान्याच्या वतीने रणजीत सरदेसाई, ऊस विकास अधिकारी विठ्ठल सुतार, सह ऊस विकास अधिकारी मोहन नुलेकर, ऊस विकास अधिकारी नामदेव पाटील यासह तुर्केवाडीसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment