कोवाड केंद्रातील शाळांत गुरुंना शुभेच्छा देताना विद्यार्थी |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
केंद्र शाळा कोवाड (ता. चंदगड) अंतर्गत जिल्हा परिषदेच्या १०, माध्यमिक शाळा ८, इंग्रजी माध्यम २, आश्रम शाळा १, तसेच उच्च माध्यमिक व महाविद्यालयात गुरुपौर्णिमेचा उत्साह दिसून आला.
सकाळी शाळेत प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजींचा पुष्पगुच्छ व शैक्षणिक भेटवस्तू देऊन सन्मान करत शुभेच्छा व्यक्त केल्या. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी गुरु पूजन केले. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमांत गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे झाली. केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड, निट्टूर, मलतवाडी, घुलेवाडी, कामेवाडी, दुंडगे, चिंचणे, तेऊरवाडी, किणी, जक्कनहट्टी आदी शाळांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुरु पूजन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment