नेसरी शिक्षण समिती सेवकांची पतसंस्थेची ३३ वी वार्षिक सभा उत्साहात, गुणवंत विद्यार्थी सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2022

नेसरी शिक्षण समिती सेवकांची पतसंस्थेची ३३ वी वार्षिक सभा उत्साहात, गुणवंत विद्यार्थी सत्कार

शिक्षण समिती पतसंस्थेच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासद गुणवंत विद्यार्थी सत्कार प्रसंगी संस्था पदाधिकारी.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षण समिती सेवकांची सहकारी पत संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा  उत्साहात संपन्न झाली. चेअरमन तथा उपमुख्याध्यापक संजय कालकुंद्रीकर अध्यक्षस्थानी होते. आर्थिक चालू वर्षात संस्थेला १० लाख ४० हजार ८८३  रुपयांचा नफा झाला. सभासदांना १४ टक्के लाभांश जाहीर झाला.  

        सचिव प्रा. एस. बी. चौगुले यांनी अहवाल वाचन केले. संचालक शशिकांत देसाई यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. यावेळी सभासदांचे गुणवंत विद्यार्थी, उल्लेखनीय कामगिरी व  विविध क्षेत्रात निवड झाल्याबद्दल सभासद यांचा सत्कार संचालक मंडळातर्फे शाल, श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन झाला. यावेळी  अशोक पांडव, सुरेश बुगडे, दिनकर पाटील, प्रा. एस. एन. पाटील, डाॅ. विकास क्षीरसागर, एल. एम. घुळाणावर, एम. ए. कांबळे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, सचिव यांनी सभासदांच्या प्रश्नांचे निरसन केले. व्हा. चेअरमन  टी. बी.  कांबळे  यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. 

         यावेळी  संचालक आय. टी. नाईक, सुरेश कोलेकर, एस. व्ही. रेंबुळकर,  रेहाना बागवान,  मॅनेजर निलम वांजोळे, लिपिक सुधीर खराबे, प्र. प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर, प्राचार्य अमृत लोहार,  मुख्याध्यापक विजय गुरबे, पर्यवेक्षक के. आर. माने, विजय नाईक,  डाॅ. संजय खमलट्टी, डाॅ. बी. आर. दिवेकर,  डाॅ. डी. के. कांबळे, प्रा. हनमंत कोले, सागर नांदवडेकर, प्रा. विष्णू चव्हाण, प्रा. सुनिल पालकर, वाय. व्ही तरवाळ,  डाॅ. संभाजी पाटील, रत्नदीप पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते. संचालक रविंद्र हिडदुगी यांनी सूत्रसंचालन केले. संचालक अनिल कोरे यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment