मजरे कारवे येथे कार पुलावरून नदित कोसळली - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2022

मजरे कारवे येथे कार पुलावरून नदित कोसळली

पुलावरून नदीत कासळलेली कार

तेऊरवाडी ( एस. के. पाटील )

मजरे कारवे (ता. चंदगड) येथे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करताना कारवरील ताबा सुटून मजरे कारवे नजीकच्या हांजहोळ नदीवरील पुलावरून हि कार

 नदितील पाण्यात कोसळली . ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली . ही कार पाण्यात अर्धवट बुडाली.  पण नागरिकांनी तात्काळ मदत केल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून कारमधील दोघेजण सुखरूप आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मजरे कारवे येथील हांजहोळ नदीवरील पुलावर समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या नादात कारवरचे नियंत्रण सुटून ती थेट  नदीत पडल्याची घटना शुक्रवारी सांयकाळी पाचच्या दरम्यान घडली. कारमधील द कल्लाप्पा बाणेकर व त्याची पत्नी  या अपघातात किरकोळ जखमी झाले . यावेळी तेथे उपस्थित असणारे तडशिनहाळचे उपसरपंच रामलिंग गुरव यांच्या प्रसंगवधानामुळे दोघांचेही प्राण वाचले.



No comments:

Post a Comment