तालुका कृषी अधिकारी सुनील जगताप यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2022

तालुका कृषी अधिकारी सुनील जगताप यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

सेवानिवृत्तीनिमित्त सुनिल जगताप यांचा सत्कार करताना मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुका कृषी अधिकारी सुनील सीताराम जगताप यांचा सेवानिवृत्तीबद्दल चंदगड येथे सपत्नीक सत्कार आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी गडहिंग्लज विभागिय कृषी अधिकारी सौ. भाग्यश्री पवार होत्या.
         प्रारंभी उपस्थितीतांचे स्वागत करून प्रास्ताविक किरण पाटील यांनी केले. यावेळी ३३ वर्षा नंतर सेवानिवृत्त झालेले कृषी अधिकारी सुनील जगताप व पत्नी सौ. सुषमा जगताप यांचा यावेळी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व साडी, चोळी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विभागीय कृषी अधिकारी सौ. पवार यांनी सेवानिवृत्तीनंतरही जगताप यानी आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा असे सांगुन उर्वरित आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
    यावेळी वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे, कोषागार अधिकारी सुनील रूकडीकर, गडहिंग्लज कृषी अधिकारी अनिल फोंडे, सरपंच माधुरी सावंत- भोसले, मडळ कृषी अधिकारी अक्षय गार्डे, श्री. पोळ, श्री. गंभरे, श्रीराम भोगण आदीसह कर्मचारीवर्ग, शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले तर आभार श्री. गार्डे यांनी मानले.

No comments:

Post a Comment