वरगाव-बेरडवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2022

वरगाव-बेरडवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

वरगाव-बेरडवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
         वरगाव-बेरडवाडी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेतील २० विद्यार्थ्यांना उपक्रमशील मुख्याध्यापक बाबुराव वरपे यांनी दप्तर, वही, पेन, अंकलिपी व शालोपयोगी पुस्तकांचे वाटप केले. शालेय विद्यार्थी व भटक्या समाजाला मुख्याध्यापक वरपे नेहमीच मदतीचा हात देत असतात. मारुती नाईक, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष महादेव नाईक यांनी सदर उपक्रमाचे कौतूक केले. विद्यार्थी, पालक व सदस्य उपस्थित होते. आभार विलास सुतार यानी मानले.

No comments:

Post a Comment