तुर्केवाडी फाट्याला तळ्याचे स्वरूप - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2022

तुर्केवाडी फाट्याला तळ्याचे स्वरूप

तुर्केवाडी फाट्यावर पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने रस्त्याला आलेले तळ्याचे स्वरूप

कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

             बेळगाव - वेंगुर्ला मार्गाला लागून असणारा तूर्केवाडी फाटा येथे रत्यावर पाणी साचल्याने या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. संबंधित यंत्रणेने तातडीने सदर ठिकाणी साचलेल्या पाण्याला मोकळी वाट करून पाण्याचा योग्य निचरा करावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.  तुर्केवाडी येथे आठवडा बाजार भरतो, तसेच हे ठिकाण मध्यवर्ती आहे. येथे ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.No comments:

Post a Comment