फाटकवाडी नंतर झांबरे प्रकल्पही तुडुंब...! ८०० क्युसेक विसर्ग सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2022

फाटकवाडी नंतर झांबरे प्रकल्पही तुडुंब...! ८०० क्युसेक विसर्ग सुरू

ताम्रपर्णी नदीवरील झांबरे- उमगाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग.

 चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

चंदगड तालुक्यातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी येथील मध्यम पाटबंधारे प्रकल्प दि. ६ रोजी ओव्हरफ्लो झाला होता. आज दि. ८ जुलै रोजी ताम्रपर्णी नदीवरील झांबरे नजीकचा मध्यम पाटबंधारे प्रकल्प पूर्ण संचय पातळीने भरला असून सांडव्यावरून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने सुहास पाटील यांनी दिली आहे. तालुक्यातील मुख्य दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शासकीय व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.

  जांबरे धरण रात्री ११ वाजता तुडुंब भरले. पूर्ण संचय पातळी ७३७ मिटर व टक्केवारी १००% क्षमतेने आहे. सध्याचा पाणी साठा २३.२३ द.ल.घ.मी. इतका आहे. सांडव्यावरुन विसर्ग ८०० क्यूसेक्स आहे. तर घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण पाणी पातळी ७४२.३५ मीटर इतकी असून सध्याचा पाणी साठा १५५९.९३४ दशलक्ष घनफूट (४४.१७२ दशलक्ष घनमीटर) व टक्केवारी १०० टक्के इतकी आहे.  



No comments:

Post a Comment