दौलतनाना शितोळे |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्यात यावे. अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात बेरड रामोशी समाजाची ७० लाख लोकसंख्या असूनही समाज अनेक सुविधांपासून वंचित राहिला आहे. राजकीय क्षेत्रात समाजाला म्हणावे तसे प्रतिनिधित्व अद्याप मिळालेले नाही. हे लक्षात घेऊन महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त आमदारपदी शितोळे यांची निवड करावी अशी मागणी संघटनेचे राज्य युवा मुख्य प्रवक्ता अमोल नाईक (कोवाड, ता. चंदगड) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. शितोळे हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment