आत्मविश्वास, प्रयत्न, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन ही यशाची त्रिसूत्री - प्रा. डॉ. ए. पी. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2022

आत्मविश्वास, प्रयत्न, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन ही यशाची त्रिसूत्री - प्रा. डॉ. ए. पी. पाटील

माडखोलकर महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाच्या निरोप समारंभावेळी बोलताना प्रा. एस. बी. दिवेकर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

              "विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. हे प्रयत्न योग्य दिशेने करण्याची ही गरज आहे. करिअर घडवण्यासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन व सदुपयोग करता आला पाहिजे. आत्मविश्वास असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. वनस्पतीशास्त्रात संशोधन व अभ्यासास वाव आहे.उत्तम करिअरच्या अनेक संधी आहेत, असे प्रतिपादन प्रा. डॉ. ए. पी. पाटील यांनी केले. 

           चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाच्या निरोप समारंभात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस. बी. दिवेकर यांनी केले. अध्यक्ष प्रा. एस. के. सावंत यांनी विद्यार्थ्यांनी डोळसपणे भोवतालच्या समाज स्थितीचे निरीक्षण करावे तसेच उच्च शिक्षण घेतानाच पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी सामाजिक जाणीवेने कार्यरत राहावे असे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुमय्या आजरेकर यांनी केले. आभार डॉ. आर. ए. कमलाकर यांनी मानले. कार्यक्रमास एन. पी. चांदेकर, डॉ. के. एन. निकम, शोभा जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment