मतदान कार्ड सोबत आधार जोडणे बाबत प्रशिक्षण चंदगड येथे संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2022

मतदान कार्ड सोबत आधार जोडणे बाबत प्रशिक्षण चंदगड येथे संपन्न



चंदगड/ प्रतिनिधी

एका व्यक्तीचे विविध ठिकाणी मतदार यादीत नाव असते. त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होतो. त्यामुळे अशी नावे ओळखून कोणत्याही एकाच मतदारसंघातील मतदार यादीत नाव कायम ठेवता यावे या उद्देशाने आता मतदान कार्ड सोबत आधार कार्ड क्रमांक लिंक केला जाणार आहे. याबाबतचे  प्रशिक्षण चंदगड तहसील कार्यालयातील सभागृहात संपन्न झाले. 

       चंदगड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक नायब तहसीलदार सचिन आखाडे यानी आधार क्रमांक सादर करणे हे मतदाराच्या वतीने ऐच्छिक असून नमुना फार्म क्रमांक 6 ब व क्षेत्रीय अधिकारी यांच्या मार्फत घरोघरी भेट देऊन ही मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेची सुरुवात 1 ऑगस्टपासून व्यापक प्रमाणात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. याबाबतचे प्रशिक्षण चंदगड तहसील कार्यालय सभागृहात संपन्न झाले. हे प्रशिक्षण चंदगड तालुक्यातील सर्व बी .एल .ओ व पर्यवेक्षक यांना देण्यात आले .यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी 1 ऑगस्ट 2022 पासून मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याच्या  मोहिमेला चंदगड तालुक्यातील जनतेने मोठा प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले. तर गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हर घर मे तिरंगा ही मोहीम यशस्वी करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून शासनाच्या हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यावेळी मार्गदर्शन केले .यावेळी व्यासपीठावर तहसीलदार विनोद रणवरे, गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार आदी मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment