पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांनी शिवशक्ती हायस्कूल अडकूरच्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2022

पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांनी शिवशक्ती हायस्कूल अडकूरच्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद

 पो. नि. संतोष घोळवे यांचे स्वागत करताना प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी शेजारी अभय देसाई, डे. सरपंच श्री. दळवी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांनी श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) च्या  विद्यार्थ्यांशी  संवाद साधून विविध सुरक्षिततेसंदर्भात महत्वपूर्ण सूचना दिल्या. यावेळी प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समिती गडहिंग्लजचे प्रशासक अभय देसाई, डे. सरपंच सुरेश दळवी आदि मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी बोलताना पो. नि. घोळवे म्हणाले, ``तंत्रज्ञानाचा वापर अधिक वाढल्याने गुन्ह्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये मुले व मुली या दोन घटकावरही मोठ्या प्रमाणात अत्याचार केला जात आहे. यासाठी विद्यार्थ्यानी सक्षम असायला हवे. विद्यार्थ्यांनी गुड टच व बॅड टच यामधील फरक ओळखल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. सर्वानी वाहतूकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. रस्त्यावरून चालताना प्रचलित रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे या नियमाला बाजूला सारून नेहमी उजव्या बाजूने चालल्यास अपघात टाळता येतील. जीवनात यशस्वी होण्यासाठी इयत्ता पाचवीपासूनच्या इतिहास, भूगोल अशा पुस्तकांच्या अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते असा विश्वास पो. नि. संतोष घोळवे यानी व्यक्त केला. या कार्यक्रमाला एस. एन. पाटील, पोलिस पाटील कल्लापा गुरव, बंकट हिशेबकर, एस. एन. पाडले, आय. वाय. गावडे, एस. के. पाटील, प्रा. रामदास बिर्जे, प्रा. एम. पी. पाटील,  प्रा. व्ही. पी. पाटील आदि जन व विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत प्राचार्य सुर्यवंशी यांनी केले.  सूत्रसंचालन पी. के. पाटील यांनी तर आभार जे. व्ही. कांबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment