कन्हैयालाल, उमेश कोल्हेंच्या मारेकऱ्यांना फासी द्या, चंदगडला श्रीराम सेना व हिंदु राष्ट्र सेनेची निदर्शने - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2022

कन्हैयालाल, उमेश कोल्हेंच्या मारेकऱ्यांना फासी द्या, चंदगडला श्रीराम सेना व हिंदु राष्ट्र सेनेची निदर्शने

तहसिलदार चंदगड यांना निवेदन देताना श्रीराम सेना व हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           उदयपुर (राजस्थान) येथील हिंदू बांधव कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांचा जिहादी प्रवृत्तीच्या मुस्लिम तरुणांनी गळा चिरून हत्या केली.  त्याचा निषेध करण्यासाठी आणि अशा जिहादी संघटनांवर बंदी घालावी या मागणीसाठी श्री राम सेना आणि हिंदू राष्ट्र सेना व चंदगड भाजपा यांच्या वतीने चंदगड येथील छ. संभाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने केली.                  भारतमाता की जय, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा  घोषणांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी आश्विनकुमार पाटील, श्रीराम सेनेचे अध्यक्ष महंतेश देसाई यांची जिहादी संघटनांवर बंदी घालावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्या करण्याची धमकी देणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.

         सदरच्या आंदोलनानंतर मोर्चाने जावून तहसीलदार विनोद रणवरे, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांना निवेदन देण्यात आले. हिंदु बांधवांची अमानुष हत्या करण्याऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. 

          या आंदोलनात संतोष चव्हाण, रघुनाथ मरगाळे, विश्वनाथ चौगुले तुकाराम मरगाळे, दयानंद पाटील, रघुनाथ चौगुले सह युवक नागरिकांनी उस्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

No comments:

Post a Comment