नेसरी येथे महावितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2022

नेसरी येथे महावितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार

नेसरी येथे महावितरण कमचाऱ्यांचा सत्कार करताना शिवसेना पदाधिकारी.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           नेसरी शिवसेना व युवसेना शाखा (ता. गडहिंग्लज) यांच्या वतीने उत्कृष्ठ कार्याबद्दल महावितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

          अधिक माहिती अशी, बुधवारी रात्री ८:३० वाजता हेब्बाळ, वाघराळी, बिद्रेवाडी, मुंगूरवाडी, मासेवाडी, लिंगणुर ह्या गावातील सुमारे साडेचार हजार ग्राहकांच्या घरातील वीजपुरवठा अचानक बंद झाला. ही बाब नेसरी व महागाव येथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी कोणताही विलंब न लावता मुसळधार पावसात तारेवाडी जंगलात जाऊन रात्री १२:३० मिनीटांनी विद्युतपुरवठा चालू केला. भर पावसात ते पण रात्रीच्या वेळी कार्यतत्परता या कर्मचाऱ्यानी दाखवली.

          त्यासाठीच नेसरी शिवसेना, युवासेना शाखेच्या वतीने महावितरण सहाय्यक अभियंता शरद पाटील, मैनुद्दीन शेख, आशय बागडी, शाम देसाई, प्रशांत देसाई, रामदास गुरव, विजय कुंभार, अस्लम शेख व स्वप्नील कोळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विष्णू कोलेकर निवृत्त पोलीस अधिकारी मुबंई, नेसरी शिवसेना शहरप्रमुख प्रकाश मुरकुटे, नेसरी युवासेना उपतालुकप्रमुख गडहिंग्लज श्रीहरी भोपळे, माहिती अधिकार कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मंजुनाथ गवळी, किरण हिड्डदुगी, विनायक कोळी, नेसरी उपशहर प्रमुख दिगंबर तेजम, नेसरी युवासेना समनव्यक सचिन नाईक, नेसरी युवासेना शहरप्रमुख कैफ दडीकर, प्रमोद मुरकुटे, आकाश हल्याळी, सौरभ गंगली, प्रशांत मुरकुटे, भागेश पांडव,रोशन आळवी उपस्थित होते. प्रास्ताविक विनायक कोळी यानी केले. प्रकाश मुरकुटे यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार शरद पाटील  सहायक अभियंता यांनी मानले.

No comments:

Post a Comment