तहसिलदारांना निवेदन देताना चंदगड तालुका चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
इंधन समायोजन आकार या नावाने झालेली वीज दरवाढ पूर्णतः रद्द करावी. यासह विविध मागण्यांसाठी चंदगड तालुका चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आज तहसीलदार विनोद रणावरे यांना निवेदन देण्यात आले. वीज वितरण कंपनीकडून इंधन समायोजन आकाराच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात वीज दरवाढ केली आहे. त्याला संघटनेचा विरोध आहे.
इंधन समायोजन आकाराची अचूक व काटेकोर तपाणी करण्यात यावी. चुकीचे आकारमान कायमस्वरूपी रद्द करण्याची कायदेशीर तरदूद करावी, अशी मागणी केली आहे. अदानी पॉवरच्या आर्थिक देण्यांबाबत सर्वसामान्य ग्राहकांचा काहीही संबंध नाही. त्यांचा बोजा सर्वसामान्य ग्राहकांवर लादण्याऐवजी राज्य शासन व महावितरणने कायदेशीर लढाई करावी , असेही अतिरिक्त सुचित केले आहे. महावितरण कंपनी विजेची गळती १४ टक्के असल्याचे सांगते. गळती १६ टक्के आहे. गळतीमुळे होणाऱ्या संपूर्ण नुकसानीचा बोजा महावितरण कंपनीवर टाकण्यात यावा.
महानिर्मिती अथवा अन्य कोणत्याही कंपनीच्या निकषांहून कमी उत्पादनामुळे वाढणाऱ्या नुकसानभरपाईचा संपूर्ण बोजा अकार्यक्षम कंपन्यांवर संबंधित टाकण्यात यावा. अदाणी कंपनीचे देणे, अकार्यक्षमता व विज गळती या तिन्ही बाबतीत ग्राहकांचा कोणताही संबंध नसताना सद्यस्थि ग्राहकांवर आणि भविष्यातही कोणताही आर्थिक बोजा लादू नये, अशी मागणी केली आहे. या वेळी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन पाटील, उपाध्यक्ष मोनाप्पा पाटील, माजी अध्यक्ष प्रल्हाद जोशी, शंकर भेकणे, सतीश सावंत, सागर नेसरकर, विशाल बेळगावकर, हळदणकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment