आंदोलनात सहभागी झालेले कामगार |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
अथर्व इंटरट्रेड संचलित दौलत शेतकरी साखर कारखान्यातील कामगार आपल्या न्याय आणि हक्काच्या मागण्यांसासाठी बेमुदत संपावर गेले आहेत. कारखान्याच्या गेटवर सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात दौलत साखर कारखान्यातील शंभर टक्के कामगार उपस्थित होते.
सिटू या कामगार संघटनेचे अध्यक्ष काँ. प्रा. सुभाष जाधव म्हणाले, ``कामगारांवर हा संप लादलेला आहे. कामगारांच्या सर्व मागण्यांसाठी प्रशासनाबरोबर चर्चा होऊन त्यातून मार्ग निघेपर्यंत एकजुटीने हा संप यशस्वी केला जाणार आहे असे सांगितले. कामगारांनी सिटू युनियनच्या माध्यमातून अथर्व व्यवस्थापनाकडे दोन वर्षे आपल्या न्याय मागण्यांसाठी पत्रव्यवहार केला आहे. मात्र अथर्व प्रशासनाने या संदर्भात कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे कामगारांनी २४ जुलै रोजी सभा घेऊन चर्चेतून मागण्या मान्य होत नसतील तर बेमुदत संप करण्याचा इशारा दिला होता.
त्यानुसार युनियनने २ ऑगस्ट रोजी अथर्व व्यवस्थापनास संपाची कायदेशीर नोटीस व मागण्यांचे निवेदन देऊन १९ ऑगस्टपूर्वी मागण्या मंजूर न झाल्यास बेमुदत संप केला जाणार असे सांगितले होते. 'त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही हालचाल न केल्याने कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. पुढील दोन दिवसात कारखाना व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्यांबाबत युनियनशी चर्चा केली नाही, तर सोमवारी चंदगड तहसील कार्यालयावर मोचनि जाऊन मुख्यमंत्री व कामगार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांनानिवेदन देण्यात येणार आहे. असेही यावेळी घोषित करण्यात आले. कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत कामगारांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी केला आहे. युनियनचे जनरल सेक्रेटरी प्रदीप पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
सभेत कॉ. आबासाहेब चौगुले, हणमंत पाटील, महादेव फाटक, अशोक गावडे, रामलिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे ऊस वाहतूकदार जोतिबा पाटील, दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत निकम व शिवाजी हसबे यांनी उपस्थित राहून या कामगारांच्या आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. दौलतचा अथर्व इंटरट्रेडशी झालेला करार बेकायदेशीर दौलत कारखान्याचे विद्यमाने संचालक वसंत निकम यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दौलतचा अथर्व इंटरटेडशी झालेला करार हा बेकायदेशीर आहे. या करारात कारखान्याच्या कुठल्याही संचालकाची साधी सहीही घेतलेली नसल्याचे स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment