पुरामुळे नुकसान झालेल्या ताम्रपर्णी व घटप्रभा नदिकाठाच्या पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी - शेतकऱ्यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2022

पुरामुळे नुकसान झालेल्या ताम्रपर्णी व घटप्रभा नदिकाठाच्या पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी - शेतकऱ्यांची मागणी

पुराच्या पाण्यामुळे कुचलेले पिक.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ताम्रपर्णी व घटप्रभा नद्यांचा पुर आला होता. या पुराचे पाणी चार ते पाच दिवस तसेच होते. या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठी असलेल्या पिके पाण्याखाली गेली होती. चार-पाच दिवस पिके पाण्याखाली असल्यामुळे पिके कुजून नुकसान झाले आहे. त्याचबरोबर नदीतून आलेला गाळही पिकांमध्ये अडकून साचून राहिल्याने पिके कूजून गेली आहेत. त्यामुळे चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी व घटप्रभा नदिकाठाच्या पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करावेत. दाटे, बेळेभाट, हल्लारवाडी, कोनेवाडी, कोरज, कुर्तनवाडी, नरेवाडी, तांबुळवाडी, हलकर्णी ते कोवाड दुंडगेपर्यंत व अडकुर  विभागातील पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे तातडीने पंचनामे करुन गणेश चतुर्थीपूर्वी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गणेश फाटक यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment