९ ऑगष्टला होणार राष्ट्रगीत गायनाचा विश्वविक्रम, सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2022

९ ऑगष्टला होणार राष्ट्रगीत गायनाचा विश्वविक्रम, सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन



तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर देशात सर्वत्र "आजादी का अमृत महोत्सव`` या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

             या अंतर्गत दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या निमित्त महाराष्ट्रातील सर्व शाळा, विद्यापीठ व महाविद्यालय, शैक्षणिक संस्था यामधुन दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एकाच वेळी राष्ट्रगीत गायन करण्यात येणार आहे. 

             सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांनी यामध्ये सामील होणार आहेत. तसेच राज्यातील नागरिकांनाही या वेळी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत गायन करावयाचे आहे. या उपक्रमाद्वारे एक विश्वविक्रम करणेबाबत शासनाने योजले आहे. त्यामुळे  चंदगड तालूक्यातील  सर्व शाळां या उपक्रमामध्ये सहभागी होणार असून सर्व नागरिकांनीही या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment