तहसिलदार यांना शुभेच्छा देताना अध्यक्ष संदीप पाटील |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
एक ऑगस्ट महसूल दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा चंदगडतर्फे चंदगड तालुका अध्यक्ष संदीप पाटील यांनी तहसीलदार विनोद रणावरे व अव्वल कारकून विलास पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुक्यातील विध्यार्थी, नागरिकांना विविध दाखले कामात येणारे अडथळे याविषयी चर्चा केली. तसेच नागरिकांना वेळेत दाखले देण्याविषयी विनंती केली. रेशन कार्ड, जमीन व्यवहार, कर्ज प्रकरणासाठी लागणारे डाकूमेंट नागरिकांना वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना येत असलेल्या अडचणी याविषयी चर्चा करून सहकार्य करावे अशी विनंती केली.
यावेळी तहसीलदार रणावरे यांनी दाखले कामात काही मदत लागली तर नागरीकांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा असे सांगितले. यावेळी प्रताप डसके, गणपत पवार, उत्तम पाटील, विलास नाईक आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment