माणगाव / सी. एल. वृत्तसेवा
बागिलगे (ता. चंदगड) ज्येष्ठ नागरिक व दौलत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, माजी सरपंच भरमु लक्ष्मण पाटील (वय - ९०) यांचे मंगळवारी दि. २ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. तांबुळवाडी (ता. चंदगड) येथील प्राथमिक विद्यामंदिरचे शिक्षक, हलकर्णी फाटा येथील पारगड शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष दयानंद पाटील, माजी सैनिक प्रकाश पाटील यांचे ते वडील होत.
No comments:
Post a Comment