ब्रह्मलिंग विकास सेवा सोसायटी कुमरीच्या चेअरमनपदी पाटील, व्हा. चेअरमनपदी गुडुळकर - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2022

ब्रह्मलिंग विकास सेवा सोसायटी कुमरीच्या चेअरमनपदी पाटील, व्हा. चेअरमनपदी गुडुळकर

नूतन चेअरमन अंकुश पाटील व व्हा. चेअरमन चंद्रकांत गुडूळकर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

                 श्री ब्रह्मलिंग विकास सेवा सोसायटी कुमरी (ता. गडहिंग्लज) च्या चेअरमनपदी अंकुश कृष्णा पाटील तर व्हाईस चेअरमनपदी चंद्रकांत परसू गुडुळकर यांची बिनविरोध निवड झाली. 

         निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका सहाय्यक निबंधक अमित गराडे यांनी काम पाहिले. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली.

             यावेळी नूतन संचालक पांडुरंग पाटील, दत्तू नाईक, रामू बेलवाडकर, संतोष गुरव, विश्वास पोळकर, बाळू देसाई, विजय पाटील, शिवाजी कांबळे, भिकाजी नाईक, सौ. धोंडूबाई मुंगुरकर, लीलाबाई ढोकरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment