लिंगायत समाजाचा ओ. बी. सी. मध्ये समावेश करुन सवलती द्या, अखिल भारतीय लिंगायत वीरशैव महासभेतर्फे मोर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2022

लिंगायत समाजाचा ओ. बी. सी. मध्ये समावेश करुन सवलती द्या, अखिल भारतीय लिंगायत वीरशैव महासभेतर्फे मोर्चा

अखिल भारतीय लिंगायत वीरशैव महासभेतर्फे बेळगावात मोर्चा.

बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा

           लिंगायत समाजाचा ओ. बी. सी. मध्ये समावेश करून सगळ्या सवलती लिंगायत समाजाला द्याव्यात. या मागणीसाठी कर्नाटकात राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले. अखिल भारतीय लिंगायत वीरशैव महासभेतर्फे बेळगावात मोर्चा काढण्यात आला.

          बेळगावातील वीर राणी कित्तूर च अन्न मा चौकातून लिंगायत समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.गेल्या पन्नास वर्षांपासून लिंगायत समाज आपल्या मागणीसाठी आंदोलन करत आहे.पण अद्याप लिंगायत समाजाचा ओ बी सी मध्ये समावेश करण्यात आलेला नाही.लिंगायत समाजाचा केवळ व्होट बँक म्हणून वापर केला जातो. 

         मठाधिशानी देखील समाजाच्या या मागणीला पाठिंबा दिलेला आहे. लवकरात लवकर लिंगायत समाजाचा ओ. बी. सी. मध्ये समावेश करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मोर्चात बहुसंख्येने लिंगायत बांधव हातात झेंडे घेवून सहभागी झाले होते. जगज्योती बसवेश्वर महाराज की जय, राणी कित्तूर चन्नमा की जय, वीरशैव महासभेचा विजय असो, न्याय द्या न्याय द्या अशा घोषणा मोर्चात सहभागी झालेल्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment