संत गजानन 'फार्मसीच्या आरभावी पुणे विभागात प्रथम, कॉलेजचा १०० टक्के निकाल, उज्वल यशाचा परंपरा कायम - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2022

संत गजानन 'फार्मसीच्या आरभावी पुणे विभागात प्रथम, कॉलेजचा १०० टक्के निकाल, उज्वल यशाचा परंपरा कायम

कु. आरती आरभावी

चंदगड  / सी. एल. वृत्तसेवा

         महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज फार्मसी कॉलेजचा १०० टक्के लागला आहे तर द्वितीय वर्षाची कु.आरती आरभावी हीने (९०.४०) टक्के गुण मिळवून पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकाविला. एम. एस. बी. टी. ई. ने मे २०२२ मध्ये या परिक्षा घेतल्या. निकालाची परंपरा कायम राखत याही वर्षी विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे.

             यामध्ये फार्मसी द्वितीय वर्षातून आरती आरभावी (९०.४०), प्रतीक फगरे (८६.६०), साक्षी शिंदे (८५.६०) तसेच प्रथम वर्षातून प्रतीक्षा  सरमळकर (८७.९०)  वैष्णवी  हेब्बाळे (८५.१०), सायली  आरडे (७२.१०) टक्के गुण मिळवित यश संपादन केले. तसेच येथील संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी च्या प्रथम वर्षातून भाग्यश्री पाटील (८५.१०) महादेवी यामी (८०.४०) आदिती पाटील (७८) टक्के मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला.

        यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अन्सार पटेल यांनी 'येथील तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा, नियमित वर्ग, नियमित सराव परीक्षा, विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील  सातत्य तसेच परीक्षा काळातील प्रश्नांचा सराव घेतल्यामुळे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे सोपे झाले. यामुळे निकाल शंभर टक्के लागला. तसेच चालू शैक्षणिक वर्षाचा प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी मुदतीच्या आत प्रवेश घ्यावा असे आवाहन केला आहे. 

         यावेळी सर्व यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण यांनी अभिनंदन केले. तर  प्राचार्य डॉ. अन्सार पटेल व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

No comments:

Post a Comment