घुबडाची सुखरुप सुटका करुन त्याला जीवदाना दिल्यानंतर घुबडासह फेसबुक फ्रेंड्स. |
बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा
रात्रभर पतंगाच्या मांजात पंख अडकून पडलेल्या घुबडाची सुखरूप सुटका नागरिकांनी आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलने करून घुबडाला जीवदान दिले. शहापूर आचार्य गल्ली येथे एका घराच्या छप्परावर मांजात पंख अडकून जखमी झालेले घुबड पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी पाहिले. नंतर आचार्य गल्लीतील गोपी गलगली, नरेंद्र बाचीकर आणि विलास अध्यापक यांनी छप्परावर मांजात पंख अडकून पडलेल्या घुबडाला छप्परावरून बाहेर काढले. त्याला खाली उतरल्यावर ते उडून दुसरीकडे गेले.
पंखात अडकलेला मांजा काढण्यासाठी घुबड हात लावायला देत नव्हते. नंतर फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर यांच्याशी संपर्क साधल्यावर त्वरित ते आचार्य गल्लीत आले आणि त्यांनी हातात ग्लोव्हज घालून घुबडाला अलगद पकडले आणि पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी त्याच्या पंखात अडकलेला मांजा हळुवारपणे काढला आणि सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. संतोष दरेकर यांनी त्याला पशू वैद्यकीय दवाखान्यात नेऊन प्रथमोपचार करून वनखात्याकडे सुपूर्द केले. पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या मांजामुळे पक्षांच्या जीवावर बेतत आहे हे पतंग उडवणाऱ्यांनी ध्यानात घेणे आवश्यक आहे, अशी सुचना यावेळी त्यांनी केली.
No comments:
Post a Comment