कोवाडे (ता. आजरा) येथे मारूती देसाई हा शेतकरी जंगलातून आरासासाठी लागणाऱ्या जंगली फूले व फळे घेऊन जाताना.
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन अगदी एक दिवसावर येवून ठेपल्याने ग्रामिण भागातील गणेशभक्त मात्र गणेशासमोर बांधण्यात येणाऱ्या जंगली वस्तूंच्या तोरणासाठी जंगल रांगात धावाधाव करत आहेत.
ग्रामीण भागात गणरायासमोर जंगलामध्ये सापडणाऱ्या विविध जंगली फुले, फळे, पाणे यांचा उपयोग करून तोरण बांधले जाते. यामध्ये कंगण्या, किरेटिची फुले, कवंडाळ, नेचे, दवना, भारोंजा फुले, संजिवनी, काकडी, सिताफळ, पेरू, तोरामत्तीची फुले, दगडी फुले आदिंचा वापर केला जातो. या सर्वांचा वापर आरास सजावटीसाठी केला जातो. या सर्व वस्तू जंगलामध्ये मिळत असल्याने शेतकरी गणेशभक्त जंगलामध्ये असणाऱ्या या वस्तू शोधन्यामध्ये दंग झाला आहे. शेतकरी दिवसभर जंगलात पायपीट करून या सर्वांची जमवाजमव करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment