सुरूते ता.चंदगड येथील प्राथमिक शाळेतील अनाथ विद्यार्थ्यीनीला दत्तक घेऊन शैक्षणिक साहित्य देताना शशिकांत सुतार, सरपंच मारूती पाटील, एम.टी कांबळे,धनाजी पाटील |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
सुरूते (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत इ. ६ वीत शिकणारी अनाथ व अपंग विद्यार्थीनी नंदीनी यलापा नाईक हिला शैक्षणिक दत्तक घेण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. वर्ग शिक्षक शशिकांत सुतार यानी शैक्षणिक खर्च करण्याचा निर्णय घेतला. सरपंच मारुती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे व शिक्षक समितीचे अध्यक्ष धनाजी पाटील उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत सदस्य नारायण चोपडे, मल्लापा पाटील, उपाध्यक्ष अवधूत भुजबळ, परशुराम भाटे, नंदिनीचे आजी आजोबा हजर होते. श्री. सुतार यांनी यावेळी नंदिनीला कपडे, स्कूल बॅग, शालेय साहित्य दिले.यावेळी शैक्षणिक उठातंर्गत मनोहर दादा पाटील यांनी शाळेला ११०००रु ची देणगी दिली. मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाला शिक्षक,पालक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन झाजरी यांनी केले तर आभार अजय पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment