चंदगड येथे गुरुकुल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फर्मचा शुभारंभ प्रसंगी बोलताना रवळनाथ बिगर शेती पतसंस्था चंदगडचे जनरल मॅनेजर एस. आर. भिंगुर्डे, शेजारी अमोल जाधव, सागर पाटील, एम. आर. पाटील व इतर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड परिसरातील सुशिक्षित तरुण तरुणींना आयटी क्षेत्रातील अद्यावत प्रशिक्षण देऊन त्यांच्या जॉबची संधी उपलब्ध करून देण्यासाठी चंदगड येथे गुरुकुल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फर्मचा शुभारंभ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त करण्यात आला. या फर्मचा शुभारंभ रवळनाथ बिगर शेती पतसंस्था चंदगडचे जनरल मॅनेजर एस. आर. भिंगुर्डे यांच्या हस्ते झाले.
फर्मचे मालक अमोल जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी वन आयटी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड सागर पाटील (गडहिंग्लज) व डोमेन कम्प्युटर्सचे एम. आर. पाटील (गडहिंग्लज) यांनी विद्यार्थीं हेच शिक्षण घेण्यासाठी मोठ-मोठ्या शहरामध्ये जातात. तेच शिक्षण येथे देण्याचा प्रयत्न केला आहे. खासकडून मुलींना बाहेरगावी पाठविताना अनेकदा विचार केला जातो. मात्र हेच शिक्षण चंदगड शहरात उपलब्ध झाल्याने मुला-मुलींची सोय होईल. तसेच नोकरीच्या संधीही भविष्यात उपलब्ध होतील असे सांगितले.
यावेळी अमोल जाधव यांनी `चंदगड तालुक्यातील ज्या मुलांना आयटी संदर्भातील कोर्सेस साठी आपला तालुका सोडून इतर ठिकाणी जावे लागत होते. शिक्षणाच्या माध्यमातून चंदगड मध्ये असणाऱ्या सुविधा या कशा वाढवता येतील व प्रोफेशनल कोर्सेस चंदगड मध्ये कसे आणता येतील. यासंदर्भात विचार करुन हि फर्म सुरु केली आहे. यामध्ये PYTHON, .NET / ASP.NET, C# MVC, C# .NET, PHP, JAVA / ADV JAVA, ADVANCE EXCEL, C/C++, CLOUD COMPUTING, LINUX, TALLY, Web Development, S/W Development, Intership, Training यासारखे कोर्सस सुरु केले आहेत.
कानुरचे शाखा मॅनेजर श्री. वाईंगडे, पाटणेचे शाखा मॅनेजर श्री. घोडके, निळकंठ पिळणकर, सुरज काणेकर, दिपक काजिर्णेकर, आर. डी. पाटील, हणमंत जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्री. गावडे यांनी सुत्रसंचालन व आभार मानले.
No comments:
Post a Comment